निधी आणि पतसंस्था / को ऑप. संस्था मधील फरक

16.02.23 06:59 AM - By Raghav Kulkarni

तसा आजचा विषय चर्चा करून करून खूप गुळगुळीत झाला आहे. पण अजूनही खूप महत्वाचा आहे. निधी कंपनीचे संचालक यांचा अनुभव एक तरी पतसंस्था/को. ऑप. संस्था मध्ये काम केलेला आहे अथवा अश्या संस्था चालवण्याचा आहे. पण आपण सर्व जण निधी कंपनी कडे पतसंस्था/को. ऑप. संस्थेच्या चष्म्यातून पाहतो. त्यामुळे प्रत्येक वेळी निधी कायदा हा त्या संस्थांच्या कायद्याशी तुलना करून समजून घेतो. खरं तर त्यात काही गैर नाही. पण निधी संस्था पूर्णतः वेगळी आहे. त्याचे संचालन, कायदा आणि कार्यपद्धती वेगळी आहे.

मी आज निधी कंपनी आणि पतसंस्था/को. ऑप. संस्था यातील मुद्देसूद फरक देत आहे. आज आपण ती संक्षिप्त १० मुद्द्यात समजावून घेऊया -

१. कायदा - निधी कंपनी ही कंपनी कायद्यान्वये तयार होते तर पतसंस्था/को. ऑप. संस्था ही महाराष्ट्र को. ऑप. कायद्यान्वये तयार होते.

२. निधी कंपनी ही केंद्र शासनाच्या अंतर्गत काम करते आणि पतसंस्था/को. ऑप. संस्था ही राज्य शासनाच्या अंतर्गत काम करते.

३. निधी कंपनी ही फक्त आपल्या सभासदांना च सेवा देऊ शकते. पण पतसंस्था/को. ऑप. संस्था ही काही सेवा सभासदा व्यतिरिक्त लोकांना पण देऊ शकते.

४. निधीचे कार्यक्षेत्र जिल्हा पर्यंत आहे. व पतसंस्था/को. ऑप. संस्था ह्याचे कार्यक्षेत्र राज्य पातळीपर्यंत आहे.

५. पतसंस्था/को. ऑप. संस्था रजिस्टर करताना आवश्यक शेअर कॅपिटल सभासदांच्या नावासकट बँकेत जमा पाहिजे. म्हणजे संस्था रजिस्टर होण्यापूर्वीच संस्थेचे नावाने बँक खाते ओपन होते आणि त्यात भांडवलाची रक्कम जमा करावी लागते.

निधी कंपनी रजिस्टर होण्यापूर्वी त्याचे बँक खाते ओपन नाही करता येत. निधी रजिस्टर झाल्यास बँक अकाऊंट ओपन करता येते आणि भाग भांडवलाची रक्कम निधी रजिस्टर झाल्यापासून १८० दिवसात बँक खात्यात जमा करता येते.

६. निधी कंपनी विनातारण कर्ज देऊ शकत नाही. पण पतसंस्था/को. ऑप. संस्था काही प्रमाणात विनातारण कर्ज देऊ शकते.

७. निधी कंपनी मध्ये कमीत कमी ३ संचालक असतात आणि पतसंस्था/को. ऑप. संस्था मध्ये कमीत कमी ७ संचालक असतात.

८. निधी कंपनी साठी Registrar of Companies (ROC) आहे आणि पतसंस्था/को. ऑप. संस्था साठी Registrar of Co. Op. आहे.

९. पतसंस्था/को. ऑप. संस्था ह्या व्यवसायासाठी कर्ज देऊ शकतात. पण निधी कंपनी व्यवसायासाठी कसलेही कर्ज देऊ शकत नाही.

१०. निधी कंपनी ला NDH-१, NDH-२, NDH-३, NDH-४, DPT-३, MSME-१, PAS-३ सारखे रिटर्न्स वेळोवेळी भरावे लागतात. आणि पतसंस्था/को. ऑप. संस्था ना वार्षिक annual report, AGM आणि इलेक्शन तपशील, इत्यादी भरावे लागते.

११. सर्वात महत्वाचे म्हणजे पतसंस्था/को. ऑप. संस्था चा मूळ उद्देश हा आर्थिक सहाय्य हा आहे. पण निधी कंपनीचा मूळ उद्देश हा कर्ज देणे हे नसून आपल्या सभासदांना बचत ची सवय लावणे हा आहे.

आपण निधी कंपनीला निधी नियमात बसून चालवले तर सुरुवातीचा काही काळ अडचण येईल. पण हे लक्षात घ्या मित्रहो, निधी आपली खारी स्पर्धा पतसंस्था/को. ऑप. संस्था सोबत नाही. त्यामुळे आपण सभासदांना मूळ बचत करण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

संस्था नवीन रजिस्टर झालेली असल्यास जास्तीत जास्त ठेवी घेऊन त्यापैकी जास्तीत जास्त ८५ टक्के रक्कम लोन स्वरूपात वाटावी. सभासदांच्या विश्वास हीच संस्थेची मालमत्ता असते. आपल्या निधी ला कमीत कमी एक वर्ष द्या आपल्या पायावर उभी राहण्यास.

एकदा जम बसला की मग सभासदांना सांगण्याची गरज नाही की आपण निधी आहोत आणि लवकरच ती विश्वासाहर्ता मिळण्यात आपल्याला यश येईल.

धन्यवाद
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434

Raghav Kulkarni