NDH-4 Rejection नोटीस

19.05.23 05:26 AM - By Raghav Kulkarni

NDH-4 Rejection नोटीस

नमस्कार 

दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी MCA नी ६८ निधी कंपन्यांचे NDH-४ अमान्य केलेले आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय यांनी पत्र जारी केले आहे त्यासंदर्भात - 

१. ज्या निधी कंपन्या नी - 
- निधी नियम पाळलेले नाहीत किंवा 
- NDH-४ भरलेला नाही अथवा 
- वेळेत भरला नाही 
- अथवा NDH-४ भरल्यानंतर वेळेत त्याचे उत्तर दिले नाही

अश्या निधी कंपन्यांचा NDH-४ अमान्य झालेला आहे. त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासाठी MCA नी राज्य पोलिस खात्याला सांगितलेले आहे. 

२. कृपया नोंद घ्या की ही काही पाहिले परिपत्रक नाही. याआधी जवळपास ४-५ वेळेस असे NDH-४ अमान्य परिपत्रक आलेले आहे. पण पोलिस खात्याकडून यावर कडक कार्यवाही आता सुरू झाली आहे. 

३. आमचा NDH-४ का अमान्य झाला ? 

सर्वसाधारणपणे NDH-४ अमान्य होण्याचे करणे विशिष्ट आहेत - 
- निधी चे NOF मागील ऑडिट झालेल्या आर्थिक वर्षात ₹१० लाख (नवीन नियमात ₹२० लाख) पेक्षा कमी असेल. 
- NOF आणि एकूण ठेवी याची सरासरी १:२० पेक्षा जास्त असल्यास. म्हणजे आपल्या ठेवी NOF च्या २० पटी पेक्षा जास्त असेल. 
- सभासद संख्या २०० पेक्षा कमी असेल. 
- आपल्या निधी मधील प्रवर्तक (promoters) कडे इतर सभासद पेक्षा जास्त टक्क्यांनी शेअर्स असेल. म्हणजे शेअर्स ची विभागणी अंदाजे सम प्रमाणात नसेल. 
- निधी ने काही रिटर्न्स उशिरा भरलेले असेल. 
- NDH-३ मध्ये कर्जाचा तपशील देताना निधी नियमात न बसणारे कर्ज पण कळवले गेले असेल. 
- निधी ने Unencumbered Term Deposit १० टक्क्यांपेक्षा कमी ठेवले असेल अथवा ग्राह्य बँकेत न ठेवता इतर बँकेत ठेवले असेल. 

४. शासनाचा विचार नेमका काय आहे ? 

निधी नियमात सन २०१९ आणि २०२२ मध्ये सुधारणा करून शासनाने निधी कंपन्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. निधी नियमात बसून काम न करणाऱ्या कंपन्यांना वेगळे करण्याचा विचार शासनाने केला आहे. त्याप्रमाणे फॉर्म NDH-४ नव्याने आणला आणि त्यातून नियमात न बसणाऱ्या निधी कंपन्या ना नोटिसा पाठवून व्यवहार बंद पाडण्याचे सत्र चालू आहे. 

निधी कंपनी नोंदणी करणे प्रत्येकाचा संवेधानिक अधिकार आहे. पण ती कंपनी नियमात काम करत नसेल अथवा दिलेले निकष पाळत नसेल तर त्या कंपन्यांना बंद करण्याचा अधिकार सरकार कडे आहे. त्याप्रमाणे शासनाला निधी संकल्पना बंदच करायची आहे असे अजिबात नाही. महाराष्ट्र राज्यातील निधी बाबत बोलायचे तर सर्व निधी कंपन्या सहकारी संस्थेच्या मानसिकता मध्ये काम करत आहे. त्यामुळे शासनाची अपेक्षा निधी कंपन्या समजून घेऊ शकत नाहीत. 

MCA ला नियम बाह्य काम करणाऱ्या निधी कंपन्या बंद करायच्या आहेत. निधी कंपन्या खूप मोठ्या सभासदांचा ग्रुप असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून हे पाऊल उचलले आहे. 

५. आता काय करायचे ? 

निधी (सुधारणा) नियम २०२२ मधील नियमाप्रमाणे ज्या निधी कंपन्यांचा NDH-४ अमान्य झालेला आहे त्यांनी तातडीने खालील बाबींचे पालन करा - 
- नवीन ठेवी घेऊ नका
- नवीन कर्ज वाटप करू नका 
- नवीन सभासद नोंदणी करता येणार नाही. 
- कंपनीचे भाग भांडवल वाढवता येणार नाही 
- जे कर्ज आधीच वाटप केलेले आहे ते जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर वसूल करून घ्या. 
- शक्य तितक्या लवकर घेतलेल्या सर्व ठेवी परत करा. 
- NDH-४ अमान्य झाल्यापासून पुढील NDH-३ भरताना काळजीपूर्वक ठेवी आणि कर्जाचा तपशील द्या. नाहीतर आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यागत होईल. 

अमान्य झालेल्या निधी कंपन्यांना पोलिस खात्याकडून नोटीस बजावण्यात येत आहे. तो खूप मोठा त्रास आहे. तशी नोटीस आल्यास काय करायचे यावर वेगळी पोस्ट करावी लागेल. तसेच काही स्थानिक पातळीवर वर्तमान पत्रात निधीचे नाव छापून येत आहे. त्याची काळजी घ्या. 

६. यातून काही मार्ग आहे काय ? 

सद्य परिस्थिती मध्ये एकदा NDH-४ अमान्य झाला की पुढे काहीच मार्ग नाही. बऱ्याच निधी कंपन्यांनी ROC अथवा RD ऑफिस ला पत्र व्यवहार केला आहे. तसेच काही कंपन्यांनी MCA ऑफिस मध्ये अथवा PMO ऑफिस मध्ये तक्रार केलेली आहे. कृपया समजून घ्या - एकदा NDH-४ अमान्य झाला की appeal करण्याची व्यवस्था निधी नियमात नाही. वरील कुठल्याही प्रकारे प्रयत्न करताना हे लक्षात घ्या की आपल्याला नवीन ठेवी आणि नवीन कर्ज करता येणार नाहीये. अति आत्मविश्वास मध्ये राहू नका. 

सध्या तरी यावर काहीच मार्ग नाही. पण प्रयत्न न सोडता शासनाच्या या धोरणाविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. 

७. सर्वांनी मिळून काय करणे अपेक्षित आहे?

NDH-४ अमान्य होणे ही वयक्तिक एका निधीची अडचण आहे असे अजिबात समजू नका. आपल्या सर्वांना आता तरी एकत्र येण्याची वेळ आहे. शासनाचा दंड, पोलिसांचा त्रास आणि सामाजिक नाचक्की पासून वाचायचे असल्यास हा प्रॉब्लेम आपल्या सर्वांचा आहे असे समजून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून काही सूचक प्रयत्न करणे गरजेचे आहे - 

- नवीन निधी कंपन्यांनी निधी नियमाचे काटेकोर पालन करा. 
- ज्यांचा NDH-४ अमान्य झालेला आहे त्यांनी नवीन ठेवी आणि नवीन कर्ज करू नका. 
- एखाद्याला अडचण आल्यास सर्वांनी मदतीला धावून या 
- व्हॉटसअप ग्रुप वर निधी सोडून इतर चर्चा, पोस्ट करू नका. सॉफ्टवेअर कंपन्यांनी हे पाळले पाहिजे. रोज सकाळी जाहिरात करून काही उपयोग नाही. 
- महाराष्ट्रात ३ फेडरेशन आहेत. यातील एक पण फेडरेशन नी निधी साठी ठोस पावले उचलली नाहीत. जोपर्यंत संगठन दिसणार नाही याचा काही फायदा नाही. अडचणी वाढत जाणार आहेत. 
- संघटित होऊन शासकीय धोरण विरोधात कुठे तरी आवाज केला पाहिजे. 

८. कोणाचा NDH-४ मान्य झालेलं आहे काय ? 

माहिती अधिकार मध्ये केलेल्या अर्जाच्या उत्तर प्रमाणे दिनांक ३ एप्रिल २०२३ पर्यंत एकही निधी कंपनीचा NDH-४ शासनाने मान्य केलेला नाही. 

९. NDH-४ भरण्यात अडचण काय आहे ? 

MCA च्या V३ मुळे NDH-४ तसेच NDH-३ भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. जानेवारी २०२३ पासून ही अडचण सुरू आहे. ज्यांचा NDH-४ उशिरा भरला जात आहे त्यांना NDH-२ फॉर्म भरण्यासाठी MCA पोर्टल कडून विचारणा होत आहे. ते चुकीचे आहे. तसेच NDH-३ भरण्यात पण तांत्रिक अडचणी येत आहेत. 

१०. अफवा वर विश्वास ठेऊ नका 

आमच्या निधीचा NDH-४ approve झाला आहे, मी तुम्हाला NDH-४ approve करून देतो, माझी ओळख MCA पर्यंत आहे, मी राजकीय मार्गातून अमुक अमुक मंत्री कडून काहीतरी करतो, इत्यादी, इत्यादी. या सर्व अफवा आहेत. कृपया अफवा ना बळी पडू नका. आपल्या CS चा सल्ला घ्या आणि नियमात बसून काम करा. 

धन्यवाद 

राघव कुलकर्णी । RBKRS
९८५०४३२४३४

Raghav Kulkarni