निव्वळ मालकीचा निधी (Net Owned Funds - NOF)

13.02.23 12:08 PM - By Raghav Kulkarni

निव्वळ मालकीचा निधी हा शब्द निधी कंपनीच्या संदर्भात आपण वारंवार ऐकला असेल. विविध वेळी आपल्याला NOF संदर्भात आपल्या निधी कंपनीच्या कार्यक्रमापासून ते आपल्या CA अथवा CS पर्यंत, विचारणा झाली असेल. मी देखील सर्व निधी कंपन्यांना प्रथम, आपले NOF किती आहे ? ह्याची विचारणा करतो. मला असे वाटले की आपण निव्वळ मालकीचा निधी म्हणजे NOF ह्या संकल्पनेला खोलात जाऊन समजावून घ्यायला पाहिजे. NOF समजणे खूप सोपे आहे. पण निधी जगतात NOF च्या मांडणीचे खूप चुकीचे अर्थ घेतले जात आहेत. ह्यातून निधी कंपनीलाच अडचण निर्माण होणार आहे.

निधी नियमाप्रमाणे प्रत्येक निधी कंपनीला आपले NOF हे ₹१० लाख ला सकारात्मक (Positive NOF) ठेवावे लागते. ही तरतूद न पाळल्यास निधी कंपनी त्यापुढील ठेवी घेऊ शकत नाही. NOF ची रक्कम आपल्याला प्रत्येक NDH-३ रिटर्न मध्ये तसेच वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ऑडिट मध्ये पण द्यावी लागते.

१. NOF म्हणजे Net Owned Funds - निव्वळ मालकीचा निधी.

२. निधी नियम २०१४ / २०१९ च्या नियम ३(१)(ड) मध्ये NOF ची संज्ञा दिली आहे. नियम ३ हा संज्ञेचा नियम आहे.

३. आपल्या भागभांडवल (paid up share capital) व मुक्त साठा (Free Reserves) ह्याच्या एकूण रकमेतून जमा तोटा (Accumulated Losses) आणि अमूर्त मालमत्ता (Intangible Assets) यांची वजावट केल्यास जी रक्कम उरते त्याला Net Owned Funds म्हणतात. NOF = Paid Up Capital + Free Reserves - Accumulated Losses - Intangible Assets.

४. अमूर्त मालमत्ता (Intangible Assets) म्हणजे आपल्या ट्रेडमार्क ची किंमत, सॉफ्टवेअर ची किंमत व इतर अमूर्त गोष्टी ज्याला Balance Sheet मध्ये घेता येतं.

५. NOF म्हणजे नुसते भागभांडवल नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपण आपले कॅपिटल ₹१० लाख केले म्हणजे आपली NOF ची पूर्तता झाली असे नाही.

६. जर आपल्या निधी मध्ये तोटा (Loss) असेल तर तेवढे आपल्याला भागभांडवल वाढवावे लागते.

७. आपले NOF ₹१० लाख असल्यास त्याच्या २० पटींनी आपण ठेवी घेऊ शकतो. म्हणजे NOF कमी असल्यास आपली ठेवी घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

NOF हा विषय समजायला कठीण वाटल्यास फेडरेशन मार्फत संपर्क करून शंकेचे समाधान करून घ्या.

धन्यवाद.
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434

Raghav Kulkarni