ग्राहक नोंदणी प्रक्रिया

13.02.23 11:44 AM - By Raghav Kulkarni

निधी कंपनी ही निधी नियम २०१४/२०१९ अन्वये चालते. ही सहकारी संस्था नाही. प्रत्येक वित्तीय संस्थेला ग्राहक नोंदणी ही आग्रही असते. ग्राहक नोंदणी झाल्यानंतर संस्था विविध सेवा देऊ शकते. निधी कंपनी साठी ग्राहक नोंदणी करण्याची प्रक्रिया इतर वित्तीय संस्थेपेक्षा वेगळी आहे.

निधी संस्था ही फक्त आपल्या सभासदाला सेवा देण्यासाठी तयार झालेली आहे. निधी कंपनी खालील सेवा आपल्या सभासदाला देऊ शकते -
१. Saving Account
२. Fixed Deposit Account
३. Recurring Deposit Account
४. Gold Loan
५. Loan against Property, Fixed Deposit, NSC, Insurance Policies
६. इतर बील भरणा, RTGS, NEFT, Standing Instruction
७. इत्यादी

आता निधी कंपनीला कोणत्याही सेवेसाठी ग्राहक नोंदणी करताना खास काळजी घेतली पाहिजे. खाली दिलेली यादी स्पष्टिकरणात्मक आहे. प्रत्येक निधी कंपनीला आपल्या अंतर्गत नियमाप्रमाणे कार्यपदधती तयार करणे गरजेचे आहे -

१. KYC
सगळ्यात महत्वाचे म्हणजे KYC. सर्व ग्राहकांची KYC घेणे अत्यंत गरजेचे आहे. निधी नियमांनी ग्राह्य असलेले KYC घेतल्याशिवाय ग्राहक नोंदणी पूर्ण करू नये. KYC न घेता ग्राहक नोंदणी केल्यास भविष्यात अडचण येऊ शकते.

२. समभाग (equity shares) वाटप
निधी नियमाप्रमाणे Deposit खात्यासाठी किमान ₹१० व लोन खात्यासाठी किमान ₹१०० चे समभाग नवीन आलेल्या ग्राहकास देणे बंधनकारक आहे. समभाग देताना निधी ने आवर्जून हे पडताळून पहावं की लोन देण्याआधी समभाग नोंदणी झालेली आहे. समभाग दिलेल्या ग्राहकाला इतर सेवा देताना परत परत शेअर कपात करत असल्यास त्याचा रेकॉर्ड नीट ठेवावा.

३. Deposit खाते
समभाग दिलेल्या ग्राहकाचे deposit खाते उघडून त्यात कॅश भरणा करता येतो. deposit खात्यातून शेअर्स खात्याला रक्कम वळती करावी. निधी कंपनीचे शेअर्स रोखीने घेता येत नाहीत.

४. लोन खाते
Deposit खात्याच्या ग्राहकाला जर आपण लोन देत असू तर त्याच्या नावे कमीत कमी ₹१०० चे शेअर्स हे तपासून पहा. नसेल तर अतिरिक्त समभाग द्यावे.

५. आपली निधी
आपल्याला कायम हे लक्षात ठेवायचं आहे की आपण सहकारी संस्था / पतसंस्था / बँक यापैकी काहीही नाहीयेत. आपण कंपनी कायद्याच्या नियमाप्रमाणे निधी कंपनी आहोत. आपला मूळ उद्देश हा सभासदांना बचत करण्याची सवय लावणे हा आहे. लोन देणे हे आपले मूळ उद्देश नाही.

धन्यवाद.
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434

Raghav Kulkarni