सध्या आर्थिक वर्ष २०१९-२० नुकतेच संपले आहे आणि वार्षिक ऑडिट सुरू झाले असेल. आजचा विषय त्यामुळेच महत्वाचा आहे.
निधी कंपनी हि एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून रजिस्टर झालेली असते. प्रत्येक वर्षी आपली बॅलन्स शीट तयार झाल्यावर वार्षिक प्रॉफीटचा आढावा घेऊन निधी कंपनीला हे ठरवता येते कि जर प्रॉफिट शिल्लक असेल तर तो लाभांश स्वरूपात आपल्या सभासदांना वाटता येतो. निधी नियम २०१४ प्रमाणे निधी कंपनीला लाभांश वाटण्यासाठी खालील नियम आहेत -
१. लाभांश देण्यासंदर्भात निधी नियम २०१४ मधील नियम क्र. १८ मध्ये तरतूद करण्यात आली आहे.
२. नियम १८ प्रमाणे निधी कंपनी एका वर्षात आपल्या एकूण शेयर कॅपिटल च्या जास्तीत जास्त २५% लाभांश देऊ शकते.
३. लाभांश देण्याआधी निधी कंपनीने कुठल्याही ठेवीदारांचे ठेवी परत करण्यात चूक केलेली नसली पाहिजे.
४. निधी नियम २०१४ व कंपनी कायद्याच्या सर्व नियमांचे पालन केलेले पाहिजे.
५. निधी कंपनीने लाभांश देण्याआधी जितका लाभांश देत आहोत तितकीच रक्कम General Reserve ला टाकली पाहिजे. म्हणजे जर निधी कंपनी २०% लाभांश देत असेल तर प्रॉफिट मधील २०% रक्कम आधी General Reserve ला टाकली पाहिजे.
इतर नियम -
१. लाभांश वाटायचा कि नाही, तसेच किती वाटायचा याचा निर्णय संपूर्णपणे संचालक मंडळाचा असतो. निधी कंपनीने लाभांश द्यावाच अशी अट सभासद घालू शकत नाहीत.
२. लाभांश हा प्रत्येक सभासदाला त्याच्या शेयर्सच्या प्रमाणात मिळतो. ज्याचे जितके शेयर्स त्याला त्याच्या प्रमाणात लाभांश.
३. निधी कंपनी जर तोट्यात असेल तर लाभांश नाही देऊ शकत.
लाभांश देणे हे निधी कंपनी साठी सन्मानाची बाब आहे. एका सकारात्मक वाढीच्या दृष्टीने वाटचाल करत असल्याचे लक्षण आहे. प्रत्येक निधीने रजिस्टर झाल्यापासून १००० दिवसात (म्हणजे ३ वर्षात) एकदा तरी कमीत कमी १०% तरी लाभांश देण्याचा विक्रम नक्की करावा किंवा तास निश्चय तरी करावा असे माझे मत आहे.
धन्यवाद
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434
लाभांश (Dividend) - निधी नियम
16.02.23 06:38 AM