आपल्या सर्वांना माहीतच आहे की निधी कंपनी आपल्या सभासदांना स्थावर मालमत्तेचे तारण करून कर्ज देऊ शकते. मी मागच्या लेखात निधी नियमात दिलेल्या सर्व तारण प्रकार बद्दल माहिती दिली होती. आज त्यातील स्थावर मालमत्ते वरील तारण प्रकार बद्दल सखोल चर्चा करू.
निधी नियम २०१४/२०१९ प्रमाणे आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की निधी मधील दिले जाणारे कर्ज हे कर्जाचा उपयोग यापेक्षा कर्जावरील तारण प्रकारावर अवलंबून आहे. म्हणजे - आपण कुठल्या नावानी आणि कशासाठी कर्ज देतो यापेक्षा आपण कर्ज कुठल्या तारणावर देतो हे महत्वाचे आहे. उदा. आपण पर्सनल लोण देत असू तर त्याच्या नवापेक्षा त्या पर्सनल लोण वर तारण काय घेत आहोत ते महत्वाचे आहे. ROC ला भरत असलेल्या विविध रिटर्न्स मध्ये तारणाच्या प्रकाराचा तपशील द्यायचा असतो.
तर निधी नियम २०१४/२०१९ मधील नियम १५ मध्ये तारणाचे प्रकार दिले आहेत. त्यातील पोट नियम ४(b) मध्ये स्थावर मालमत्तेवर दिले जाणाऱ्या कर्जाबाबत माहिती दिली आहे.
निधी कंपनी आपल्या सभासदांना स्थावर मालमत्ते वर तारण करून कर्ज देऊ शकते. त्यासाठी खालील नियम आहेत -
१. स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य कितीही असले तरी एका व्यक्तीला आपण निधी नियम १५(२) प्रमाणे जेवढे कर्ज देऊ शकतो त्यापेक्षा पुढे जाता येणार नाही. ही क्षमता प्रत्येक निधी कंपनीने आपल्या CS सोबत चर्चा करून ठरवावी.
२. स्थावर मालमत्ता तारण कर्ज आपण ७ वर्षाच्या कालावधी साठी देऊ शकतो.
३. तारण दिलेल्या मालमत्ते च्या बाजार मूल्याच्या ५० टक्क्यांपर्यंत रकमेचे कर्ज अथवा वरील नियम १५(२) प्रमाणे आपल्या क्षमते प्रमाणे जी रक्कम कमी असेल ते कर्ज देता येईल. ही पूर्तता आपल्याला कायम तपासून पहायची आहे.
४. नोंदणी केलेल्या स्थावर मालमत्ता तारण कर्ज (Registered Mortgage Loan) वगळून आपल्या निधी ने दिलेले एकूण स्थावर मालमत्ता तारण कर्ज हे आपल्या निधी मधून दिलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसले पाहिजे. हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. उदा. जर आपल्या निधीमधून दिलेले सर्व प्रकारचे कर्ज (सोने तारण, mortgage कर्ज, FD तारण, इन्शुरन्स तारण कर्ज) याची एकूण रक्कम समजा ₹१०० लाख असेल तर - त्यातील स्थावर मालमत्ता तारण कर्ज ₹५० लाख पेक्षा जास्त नसावे.
एक तर स्थावर मालमत्ता तारण कर्ज प्रदीर्घ कालावधी साठी दिले जाते. म्हणून आपल्याला रोख तुटवडा पडू नये यासाठी हा नियम केला असावा. जर आपण सर्व कर्ज स्थावर मालमत्ता तारण कर्ज प्रकारात दिले तर ऐन वेळी आलेल्या withdrawal साठी पैश्यांची तरलता तुटवडा (Liquidity Crunch) राहणार नाही.
वरील नियमाची पूर्तता आपल्या निधी मध्ये झालेली आहे का ते तपासून पहा. निधी नियम न पाळल्यास प्रत्येक संचालक व कंपनी ला ₹५००० आणि जर त्याहून उशीर झाला तर दररोज प्रत्येकी ₹५०० दंड होऊ शकतो. स्थावर मालमत्ता तारण कर्ज दिलेल्या निधी कंपनीने नियम २० मध्ये दिलेले विवेकी निकष पण काटेकोरपणे तपासले पाहिजे. विवेकी निकष वर मी मागे लेख लिहिला आहे. कोणाकडे नसल्यास मला सांगा. मी परत पाठवतो.
धन्यवाद,
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434
स्थावर मालमत्ते वर दिलेले कर्ज (निधी नियम)
16.02.23 07:44 AM