निधी कंपनी ही वित्तीय संस्था म्हणून कार्य करत असते. आपले सभासद संस्थेच्या विश्वासाने गुंतवणूक करतात. सभासदांनी आपल्या निधी मध्ये दिलेल्या ठेवी आणि त्यांनी घेतलेले कर्ज याचा समन्वय साधणे हे निधीचे काम आहे. आपल्या निधीचे प्रत्यक्ष उत्पन्न हे कर्जाचे व्याजदर आणि ठेवीचे व्याजदर ह्यातील फरक हे आहे. त्यामुळे निधी कंपनीने आलेल्या व दिलेल्या रोखीचे योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
वित्तीय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांनी खरंतर मासिक नियोजन केले पाहिजे. ठेवीच्या माध्यमातून घेतलेला एक एक रुपया हा कर्ज स्वरूप लवकरात लवकर कसा देता येईल हे नियोजन गरजेचे आहे. त्यासाठी त्रैमासिक आढावा कार्यपद्धती (Quarterly Review Methodology) अवलंबली पाहिजे.
एका आर्थिक वर्षात ४ त्रेयमाहिक सत्र येतात. प्रत्येक सत्राचे खालील प्रमाणे नियोजन केल्यास आपल्या नफ्यात वृद्धी निश्चित होईल-
१. निधी कंपनीने व्यावसायिक आराखडा (Business Plan) तयार करावा. त्रयमाहिक आवक जावक व नफा ह्याचे नियोजन आराखड्यात करावे. जसं देशाच्या बजेट मध्ये "कसा येईल रुपया आणि कसा जाईल रुपया" असते, तसे निधी ने पण करावे.
२. व्यावसायिक आराखडा करताना तज्ज्ञांची म्हणजे आपले CA, CS, Advocate, Management Consultants ची मदत आणि विचार लक्षात घ्यावे.
३. आपात्कालीन रोखे (Reserve Fund) हा निधी नियमाप्रमाणे संपूर्ण ठेवीच्या १०% फक्त असे न करता कमीत कमी २२% ठेवावे.
४. आपल्या सभासदांना जास्तीत जास्त बचत करण्यास प्रबोधन करावे. ह्यासाठी विविध ठेवीच्या तसेच RD ची योजना आणाव्या.
५. मागील ३ महिन्यात आलेल्या FD, RD व तसेच दिलेले लोन, त्याचा कालावधी याचे परीक्षण करावे (Quarterly Compliance Check)
६. आपले संकल्पित आणि वास्तविक (Budgeted अँड Actual) याची तुलना करून तफावत कुठे आहे याचा अंदाज घ्यावा व वेळीच उपाययोजना करावी.
धन्यवाद.
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434