निधी कंपनी - जाहिरातीचे नियम

13.02.23 12:15 PM - By Raghav Kulkarni

Nidhi Management Part-5

आज आपण एका खूप आवडत्या विषयावर चर्चा करू. निधी कंपनीचे जाहिरातीचे नियम.

आपल्या सर्वांनी ऐकले असेल की निधी कंपनी जाहिरात करू शकत नाही. निधी कंपनी कशी चालते ह्याबद्दल कधी पण काही ऐकायला आले तर कायम हे लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत निधी नियम २०१४ / २०१९ अन्वये त्या गोष्टीची शहानिशा होत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेऊ नका. आपण ऐकत आहोत ते सत्य आहे की नाही हे जबाबदारीने पडताळून पाहिले पाहिजे. ह्यासाठी आपल्या निधीच्या CS अथवा CA ना विचारणा करावी.

आपण सारखे ऐकतो की निधी कंपनी कुठलीही जाहिरात करू शकत नाही. निधी कंपनीच्या जाहिरातीबद्दल निधी नियम २०१४ मधील नियम ६, पोट नियम (j) मध्ये तरतूद आहे. आधी नियम काय आहे तो समजून घेऊया.

निधी नियम ६ मध्ये निधी कंपनीचे सर्वसाधारण प्रतिबंध (General Restriction) सांगितले आहेत. त्यातील पोटनियम (j) प्रमाणे निधी कंपनी ठेवी घेण्यासाठी अथवा ठेवी संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती देणारी जाहिरात करू शकत नाही. ह्या नियमाला एक अपवाद आहे. जर निधी कंपनी आपल्या सभासदांसाठी वयक्तिक वितरण तत्वावर आपल्या मुदत ठेव योजनेची (Fixed Deposit Scheme) माहिती देत असेल तर आपण नियम ६(j) चे उल्लंघन करत नाहीत.

इथे आपण दोन महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत -

१. जर जाहिरात सभासदांच्या वयक्तिक वितरणासाठी असा उल्लेख करून फक्त सभासदांना दिली तर ते नियमाचे उल्लंघन नाही.

२. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निधी नियमात फक्त ठेवीच्या संदर्भात जहिरतीवरील निबंधाचा उल्लेख आहे. म्हणजे जाहिरातीचे नियम फक्त ठेवी संदर्भातच आहेत. आपण ह्याचं अर्थ असा घेऊ शकतो का की आपल्याला कर्जाच्या योजनेबद्दल जाहिरात करता येते? नियमात स्पष्ट उल्लेख आहे की आपण ठेवींच्या संदर्भात जाहिरात नाही करू शकत. कर्जाच्या बाबतीत जाहिरातीचा कुठेच उल्लेख नाही. नियम कर्त्याला जर सर्वच जाहिरातीवर निर्बंध ठेवायचे असते तर तसा स्पष्ट उल्लेख केला असता असे मला वाटते.

तसेच निधी कंपनीच्या जाहिराती संदर्भात आपण छोट्या छोट्या शंकेची चर्चा करू -
१. "फक्त सभासदांसाठी" असा लिहून उघडपणे जाहिरात करता येणार नाही.
२. कोणत्याही प्रकारे निधी जाहिरात करू शकत नाही. म्हणजे जाहिरातीचे स्वरूप कुठले पण असू देत, ती नियमबाह्य आहे.
३. वरीप्रमाणे संदर्भ लक्षात घेतल्यास ठेवीच्या व्यतिरिक्त sponsorship देणे, फ्लेक्स लावणे, रक्तदान शिबिर सारखे सामाजिक उपक्रम करणे याला निर्बंध नसावा.
४. निधी कंपनीने जाहिरातीसाठी केलेला खर्च आपल्या ऑडिट मध्ये घेता येतो.

उदाहरणार्थ मी काही जाहिरातीचे प्रकार देत आहे -

१. निधीचा ब्रँड असलेले शालेय साहित्य
२. ग्रामीण भागात पाण्याच्या टाकीवर निधीचे नाव पेंट करणे
३. विविध सामाजिक उपक्रम- हळदी कुंकू, वृक्षारोपण, प्रौढ शिक्षण, CSR,
४. कॉर्पोरेट गिफ्ट (ब्रँडेड चहाचा कप, बाशी, पेन, मोबाईल कव्हर, पेन ड्राईव्ह)
५. मोबाईल फ्लायर
६. वेबसाईट, फेसबुक आणि इतर डिजिटल मीडिया.

हा लेख लिहिताना मला पूर्ण जाणीव आहे की माझ्या मतबद्दल काही जणांना शंका असेल. वरील मत माझे वयक्तिक आहे. कायदेशीर सल्ल्याने आपले निर्णय घ्यावे.

धन्यवाद
Raghvendra Kulkarni | RBKRS |9850432434

Raghav Kulkarni