Unencumbered Term Deposit ही संज्ञा आपण निधी कंपनी चालवताना खूप वेळेला ऐकली असेल. आपल्याला माहीतच असेल की निधी कंपनी आपल्या सभासदांकडून घेतलेल्या ठेवितून कर्ज देते. निधी कंपनीने घेतलेल्या ठेवी विविध कालावधीचा असतात. आणि कर्जाची मुदत पण विविध असते. निधी कंपनी ला ठेवींची परतफेड आणि कर्जाची वसुली याचा समन्वय साधून संपूर्ण कारभाराचे आर्थिक नियोजन करावे लागते. हे करणे सोपे नाही. एक वित्तीय संस्था असल्या कारणाने निधिला कायम हे पाहायचे असते की ठेवी स्वरूपात आलेला प्रत्येक रुपया हा जास्तीत जास्त नफ्यात आणि लवकरात लवकर कर्ज म्हणून वाटला गेला पाहिजे. नुसत्याच घेऊन ठेवलेल्या ठेवी निधी कंपनीला व्याजाच्या खर्चात टाकतात.
ठेवी आणि कर्जाचे नियोजन करताना निधी कंपनीला आपत्कालीन ठेवी परतफेड (Emergency Pre-maturity of Deposits) ची तरतूद असणे बंधनकारक आहे. असे गृहीत धरा की अचानक काही ठेवीदार आपल्या निधी मध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या ठेवीची परतफेड मागितली तर निधी कंपनी ची तारांबळ उडेल. काही निधी कंपन्या ठेवींवर तारण करून कर्ज देतात. म्हणजे त्या ठेवी कर्जाच्या तारणात व्याप्त झालेल्या असतात. अश्या व्याप्त ठेवी पटकन रोख नाही करता येत.
निधी नियम २०१४ मधील नियम १४ मध्ये अश्या आपत्कालीन तरतुदीचा उल्लेख आहे. याला अव्याप्त मुदत ठेव (Unencumered Term Deposit) असे म्हणतात. अव्याप्त मुदत ठेव म्हणजे अश्या ठेवी ज्या कर्ज स्वरूपात वाटलेल्या नाहीत. किंवा त्या ठेवी ज्यावर तारण करून कर्ज दिलेले नाही. कंपनी कायदा व निधी नियम असे म्हणते की निधी कंपनीने आपल्या सर्व ठेवीच्या १० टक्के रक्कम शेड्युल कमर्शियल बँक अथवा पोस्ट ऑफिस ठेवी मध्ये अव्याप्त मुदत ठेव स्वरूपात कायम ठेवावी. ही रक्कम कुठल्याच कारणासाठी वापरता येत नाही. ह्या ठेवीवर निधीला मिळालेला व्याज हे निधीचे उत्पन्न आहे.
ही संकल्पना समजावून घेताना खूप काळजी घेतली पाहिजे. मला आत्तापर्यंत बऱ्याच निधी परिषदेत चेअरमन मध्ये शंका दिसली आहे. ह्या नियमाचे पालन करताना काही मूलभूत प्रश्न पडतात. म्हणून मला असे वाटले की ह्या लेखात आपण त्या प्रश्नाचे उत्तर देऊन संकल्पना समजावून घेऊ.
१. कुठल्या ठेवी १० टक्के मध्ये गृहीत धरावे ?
निधी नियम २०१४ प्रमाणे ठेवी म्हणजे मुदत ठेव (Fixed deposit), आवर्त ठेव (Recurring Deposit) आणि बचत खाते (Saving Deposit) याची बेरीज. त्यामुळे १० टक्के मोजताना वरील तिन्ही खात्याची एकूण बेरीज घ्यावी.
२. कुठल्या तारखेची बेरीज घ्यावी ?
आपल्या सॉफ्टवेअर मधील दुसर्या मागील महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी व्यवसाय संपल्यावरची थकबाकी जमा. म्हणजे मागील ६० दिवसांपूर्वीची रक्कम.
३. ही रक्कम कधी पर्यंत बाजूला काढावी ?
नियम १४ प्रमाणे ही १० टक्के रक्कम कायम देखणे गरजेचे आहे. माझ्या मताप्रमाणे प्रत्येक निधीचे सर महिन्याला ह्या नियमाचा आढावा घ्यावा आणि पूर्तता करावी. याचा तपशील अर्ध वार्षिक NDH-३ रिटर्न मध्ये ROC ला कळवला जातो.
४. ही ठेव सहकारी बँकेत ठेवली तर चालेल का ?
नाही. सहकारी बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेत ठेवलेली चालत नाही. शेड्युल कमर्शियल बँक अथवा पोस्ट ऑफिस मधेच ठेवावी.
५. ठेवी कमी जास्त होत असतात तर काय करावे?
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला आपण ह्याचं आढावा घ्यावा आणि एकूण ठेवीच्या १० टक्के रक्कम भारत नसल्यास कमी पडाळणीसाठी असलेली आपत्कालीन ठेव वाढवावी. जर जास्त असल्यास आपण ती रक्कम काढून वापरू शकता.
६. अचानक पैसे लागणार असल्यास काय करावे ?
कंपनी कायद्याच्या प्रादेशिक संचालक कडे (Regional Director) आपल्या संमती मागता येते.
माझ्या अनुभवानुसार मी वरील विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजून पण प्रश्न असतील हे मला माहीत आहे. असल्यास फेडरेशनच्या माध्यमातून मला कळवा म्हणजे मी आपल्याला उत्तर देऊ शकेल.
धन्यवाद.
Raghvendra Kulkarni | RBKRS | 9850432434