NDH फॉर्मची माहिती

16.02.23 07:23 AM - By Raghav Kulkarni

निधी कंपन्यांना वेळोवेळी खास निधी कंपनी साठी असलेले फॉर्म्स भरणे गरजेचे आहे. हे फॉर्म्स इतर कंपनी कायद्यातील फॉर्म्स च्या व्यतिरिक्त आहेत. त्याची संक्षिप्त माहिती देत आहे.

NDH-१
नाव - Return of Statutory Compliances
फॉर्मचा कालावधी - पाहिले आर्थिक वर्ष संपल्यापासून ९० दिवसाच्या आत.
भरण्याची तारीख - ३० जून
फॉर्म बद्दल माहिती - निधी रजिस्टर झाल्यापासून पाहिले आर्थिक वर्ष संपेपर्यंत निधी नियम २०१४ मधील नियम ५ ची पूर्तता झाली आहे की नाही याचा तपशील दिला जातो. Net Owned Funds, Unencumbered Term Deposit, २०० सभासद आणि NOF आणि Deposit मधील १:२० चे प्रमाण, ही माहिती भरावी लागते.

NDH-२
नाव - Application for extension of time
फॉर्मचा कालावधी - संस्था रजिस्टर झाल्यापासून ३६५ दिवसाच्या आत
भरण्याची तारीख - नोंदणी तारखेपासून एक वर्षाच्या आत कधी पण.
फॉर्म बद्दल माहिती - जर आपल्या निधी मध्ये नियम ५(१)(a) अथवा (d) प्रमाणे Net Owned Funds अथवा २०० सभासद ची पूर्तता संस्था नोंदणी झाल्यापासून १ वर्षात होत नाही असे दिसले तर हा फॉर्म भरायचा. हा फॉर्म भरताना सदर पूर्तता का नाही झाली ह्याची कारणे द्यावी लागतात. ही मुदतवाढ जास्तीत जास्त एक वर्षासाठी मिळते. 
तसेच नवीन शाखा सुरू करत असाल तर त्याचे निवेदन MCA ल याच NDH-२ मध्ये भरले जाते. 

NDH-३
नाव - Return of Nidhi Company for the half year ended
फॉर्मचा कालावधी - एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च
भरण्याची तारीख - ३० ऑक्टोबर आणि ३० एप्रिल
फॉर्म बद्दल माहिती - वर्षातून २ वेळा भरायचा फॉर्म. ह्या फॉर्म मध्ये मागील ६ महिन्यातील निधी कंपनीने केलेल्या व्यावसाचा तपशील जातो. ह्यात सभासदांची यादी, ठेवीदारांची यादी, Unencumbered Term Deposit, १:२० चे प्रमाण, इत्यादी सर्व माहिती जाते.

NDH-४
नाव - Application for declaration as Nidhi Company and for updation of status by Nidhis
फॉर्मचा कालावधी - संस्था रजिस्टर झाल्यापासून ३६५ दिवसाच्या आत
भरण्याची तारीख - नोंदणी तारखेपासून एक वर्षाच्या आत निधी नियम २०१४/२०१९ च्या सर्व बाबींची पूर्तता झाल्यास. आपली निधी दिनांक १९ एप्रिल २०२२ नंतर नोंदणी झालेली असल्यास नोंदणी पासून १२० दिवसाच्या आत.
फॉर्म बद्दल माहिती - हा फॉर्म निधी कंपनीच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा फॉर्म आहे. निधी नियम २०१४/२०१९ मध्ये निधी कंपनीने पाळण्याच्या सर्व बाबींचा लेखाजोखा भरला जातो. निधी कंपनीने अपेक्षित सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे अशी अपेक्षा हा फॉर्म भरण्यासाठी आहे.

वरील फॉर्म्स भरण्यात आपल्या CS ची मदत होते. तरी आपण त्यांना संपर्क करून पूर्तता करून घ्यावी.

धन्यवाद
Raghvendra Kulkarni | RBKCS | 9850432434

Raghav Kulkarni