निधी (सुधारणा) नियम २०२२ चे विवेचन (भाग-२)

16.02.23 08:56 AM - By Raghav Kulkarni

निधी कंपन्यांची संजीवनी

भाग २ मध्ये आपण इथून पुढे रजिस्टर होणाऱ्या निधी कंपन्यांना नवीन नियम आणि निकष काय आहेत ते पाहू. सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येक निधी कंपनी एक तर निधी सुधारित नियम २०२२ पूर्वीच्या आहेत नाहीतर नंतरच्या आहेत. सर्व नियम या प्रमाणेच दिलेले आहेत. 

नवीन निधी रजिस्टर केल्यास - 

आता यापुढे नवीन निधी रजिस्टर केल्यास लागू असलेल्या नियमात बराच बदल केला आहे. खरं तर आपल्या सर्वांना निधी संचलनात येत असलेल्या विविध अडचणींचे एकप्रकारे समाधानकारक उत्तर मिळाले आहे. NDH-४ मुळे गेल्या काही दिवसात बरेच संचालक निधी कंपनीचे रजिस्ट्रेशन पासून परावृत्त होताना दिसत होते. आणि स्वाभाविक होते. निधी कंपनीतून व्यवहार चालू करायचा आणि नंतर NDH-४ मुळे बंद करायचा या अनिश्चित नियोजनावर अवलंबून व्यवहार करणे सुज्ञपणाचे लक्षण नाही. 

पण आता निधी (सुधारणा) नियम २०२२ च्या पावलांनी नवीन निधी साठी संजीवनी मिळाली आहे. नवीन निधी साठी असलेले नियम काय आहेत ते आपण पाहू - 

१. निधी नियमात नव्याने आलेला नियम 3B आता नवीन निधी कंपन्यांच्या नियमासाठी राखीव असेल. 

२. आधीच्या नियमाप्रमाणे NDH४ फॉर्म भरण्यासाठी नवीन कंपन्यांना १४ महिन्यांचा वेळ दिला होता. पण आता सुधारित नियमाप्रमाणे आपली नवीन निधी रजिस्टर झाली की १२० दिवसात NDH-४ फॉर्म भरायचा आहे. 

३. दिलेल्या १२० दिवसात फॉर्म भरायला निधी कंपनीला खालील निकष असतील - 

- शेअर्स दिलेल्या सभासदांची संख्या कमीत कमी २०० असावी. 
- निधीचे Net Owned Funds (NOF) म्हणजे स्व- मालकीचा निधी कमीत कमी रू. २० लाख असला पाहिजे. 
- सर्व संचालक आणि प्रवर्तक नी आपण निधी कंपनी चालवण्यासाठी योग्य आणि तदुरुस्त (Fit and Proper) असल्याचा दाखला द्यायचा. हा दाखला अतिशय तपशीलवार आहे आणि यात खोटी अथवा चुकीची माहिती देता येणार नाही. 

४. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आता आपण भरलेल्या NDH-४ फॉर्म साठी नियम 4 प्रमाणे केंद्र शासनाने आपण भरलेल्या NDH-४ ला मान्यता (Approval) अथवा नामंजूर (Rejection) आपण भरलेल्या तारखेपासून फक्त ४५ दिवसात द्यायचे आहे. दिलेल्या ४५ दिवसात जर शासनाने काही हालचाल नाही केली तर आपल्या NDH-४ ला मान्यता मिळाली आहे असे गृहीत धरण्यात येईल. 

५. मान्य झालेल्या सर्व निधी कंपन्यांना नोटिफाइड निधी (सूचित निधी) असे संबोधण्यात येईल. अश्या निधी कंपन्यांची यादी MCA वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल. तसेच शासनाकडून अश्या निधी ना एक NDH-४ मान्यता प्रमाणपत्र (NDH-4 Approval Letter) मिळेल. 

६. वरील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आपण व्यवहार चालू करण्यासाठीचा फॉर्म २०A भरता येणार नाही. याचा अर्थ असा झाला की आपल्याला निधी कंपनी रजिस्टर तर करता येईल, पण जोपर्यंत NDH-४ ची मान्यता मिळत नाही तोपर्यंत निधी म्हणून व्यवहार चालू नाही करता येणार. हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. महाराष्ट्रात बऱ्याच निधी रजिस्टर होण्याआधी व्यवहार चालू करतात आणि नंतर अडचण होऊन बसते. 

७. नवीन नियमाप्रमाणे निधी नोंदणी करताना किमान शेअर्स कॅपिटल ₹१० लाख असणे अनिवार्य आहे. आधी ही मर्यादा ₹५ लाख होती. कृपया किमान शेअर्स कॅपिटल आणि NOF मध्ये गोंधळून जाऊ नका. किमान शेअर्स कॅपिटल नोंदणी करताना ₹१० लाख हवे आहे आणि NOF ₹२० लाख हवे आहे. 

८. जर एखादी व्यक्ती ५ पेक्षा जास्त निधी मध्ये संचालक असेल अथवा ३ पेक्षा अधिक निधी मध्ये प्रवर्तक (Promoter) असेल तर त्याला नवीन निधी नोंदणी करता येणार नाही. 

९. वरील चर्चेचा सारांश असा आहे की नवीन निधी नोंदणी करायची असल्यास खालील पात्रता तपासून पहा. 
- नोंदणी करताना संचालकांची आणि प्रवर्तकचा इतर निधी मधील सहभाग 
- किमान शेअर्स कॅपिटल ₹१० लाख. 
- प्रवर्तक मंडळाची पार्श्वभूमी 
- नोंदणी झाल्यापासून जास्तीत जास्त १२० दिवसाच्या आत NOF ₹२० लाख आणि एकूण सभासद २०० पेक्षा जास्त उभारण्याची तयारी

नवीन नियमावली मुळे निधी नोंदणी खर्चात बरीच वाढ झालेली आहे. तरी पण नवीन निधी कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम उभारल्या गेल्या पाहिजे या शासनाच्या विचाराशी मी सहमत आहे. तसेच आता नवीन नोंदणी करताना आपला NDH-४ मान्य होईल का याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर नसेल. 

धन्यवाद 
Raghvendra Kulkarni। RBKRS | 9850432434

Raghav Kulkarni